महावितरणला फसवणाऱ्या कंपन्यांवर छापे

महावितरणला फसवणाऱ्या कंपन्यांवर छापे

Published on

महावितरणला फसवणाऱ्या कंपन्यांवर छापे
आर्थिक गुन्हे शाखेची मुंबई-ठाण्यासह गुजरात, दिल्लीत कारवाई

मुंबई, ता. २३ : आर्थिक गुन्हे शाखेने महावितरण कंपनीला तब्बल १२२.८४ कोटी रुपयांना फसवणाऱ्या चार खासगी कंपन्यांची कार्यालये आणि संचालकांच्या निवासस्थानी छापे घातले. या कारवाईत गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे कागदोपत्री आणि डिजिटल पुरावे हाती लागल्याचे सांगण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २१ फेब्रुवारीला मुंबई, ठाण्यासह दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांतील सहा ठिकाणी छापे घालण्यात आले.

सौर कृषी वाहिनी २.० योजनेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन चार खासगी कंपन्यांनी महावितरणकडे बनावट बँक गॅरंटी सादर करून वीज खरेदी करार केले. कराराच्या अटींप्रमाणे आर्थिक समापन (फायनान्शियल क्लोजर) करणे टाळले. या कंपन्यांनी कंत्राट घेताना सादर केलेल्या एकूण १२२.८५ कोटींच्या बँक गॅरंटी रोखीकरणासाठी बँकेत सादर केल्या. तेथे त्या बनावट असल्याचे बँकेकडून महावितरणला समजले.

बनावट बँक गॅरंटी खरी असल्याचे भासवून सादर करून कोट्यवधींची फसवणूक केल्याने महावितरणकडून मेसर्स नॅकॉफ ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड-मेसर्स एनओपीएल प्रोजेक्ट्स प्रा. लि., मेसर्स इंटिग्रेशन इंडक्शन पॉवर लिमिटेड-मेसर्स आयआयपीएल हिंगोली प्रा. लि.-मेसर्स आयआयपीएल परभणी प्रा. लि., मेसर्स नॅकॉफ ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड-मेसर्स एनओपीएल पेस ग्रीन एनर्जी प्रा.लि., मेसर्स ओनिक्स रिन्युएबल लिमिटेड-मेसर्स ओनिक्स आयपीपी लिमिटेड या कंपन्यांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. २० फेब्रुवारीला आर्थिक गुन्हे शाखेने या चार कंपन्यांविरोधात निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
----
वरिष्ठ अधिकारी चाैकशीच्या फेऱ्यात
सुमारे १०० कोटींची बनावट बँक गॅरंटी देणाऱ्या अन्य एका कंपन्यांविरोधात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याचाही तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. गुन्ह्यात कंपन्यांना वैयक्तिक स्वार्थासाठी सहकार्य करणारा महावितरणचा वरिष्ठ अधिकारी सध्या चौकशीच्या फेऱ्यात असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com