विधान भवन परिसरात ‘पे अँड पार्क’ स्थगित
विधान भवन परिसरात
‘पे अँड पार्क’ स्थगित
वाहतुकीतही महत्त्वाचे बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन साेमवारपासून (ता. २३) सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधान भवन आणि नरिमन पॉइंट परिसरात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या कालावधीत अनेक मार्गांवरील ‘पे अँड पार्क’ सुविधा रद्द करण्यात आली आहे.
काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. मुंबईचे वाहतूक पोलिस उपआयुक्त (दक्षिण) प्रशांत परदेशी यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. हे आदेश २३ फेब्रुवारीपासून अधिवेशन संपेपर्यंत लागू राहतील. व्ही. व्ही. राव मार्ग आणि फ्री प्रेस जनरल मार्ग या ठिकाणी केवळ मान्यवरांची वाहने उभी केली जातील. इतर वाहनांना येथे पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे.रामनाथ गोएंका मार्गावर साखर भवन जंक्शन ते विधान भवन मार्ग यादरम्यान गरज भासल्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी घातली जाईल. मात्र पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांना यातून सवलत असेल, असे वाहतूक पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.
येथील सुविधा बंद
जमनालाल बजाज मार्ग (उषा मेहता चौक ते डेड एंड), विनय के. शहा मार्ग (जमनालाल बजाज मार्ग जंक्शन ते मुरली देवरा चौक), दोराबजी टाटा रोड (मुरली देवरा चौक ते गेंडा पॉइंट), रामनाथ गोएंका मार्ग (साखर भवन जंक्शन ते विधान भवन मार्ग), विधान भवन मार्ग (युनियन बँक बिल्डिंग ते मादाम कामा रोड) या मार्गांवर सर्वसामान्यांसाठी असलेली पार्किंग सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

