साडेपाच लाखांची भिक्षा मागणाऱ्या तृतीयपंथींवर खंडणीचा गुन्हा
साडेपाच लाखांची भिक्षा मागणाऱ्या तृतीयपंथींवर खंडणीचा गुन्हा
मुंबई, ता. २३ ः बांधकाम व्यावसायिकाकडे साडेपाच लाखांची भिक्षा मागणाऱ्या आणि ती न दिल्यास मुहूर्ताचा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी देणाऱ्या तृतीयपंथींच्या टोळीविरोधात वांद्रे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवला. हा प्रकार २१ फेब्रुवारीला घडला.
वांद्रे येथील हील रोड येथे जीव्हीपी रियालिटी कंपनीने गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतला आहे. २१ फेब्रुवारीला मुहूर्ताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी तेथे दोन तृतीयपंथी पोहोचले. त्यांनी प्रकल्पस्थळी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी त्यांना शिवीगाळ करीत मालकाला साडेपाच रुपये द्यायला सांग अन्यथा मुहूर्ताचा कार्यक्रम उधळून लावू, अशी धमकी दिली. जाताजाता त्यांनी त्यांचा संपर्क क्रमांक त्या ठिकाणी सोडला आणि दुपारपर्यंत मागणी पूर्ण करण्याची धमकी दिली. हा प्रकार समजताच बांधकाम व्यावसायिकाने तातडीने वांद्रे पोलिसांना घटना कळवली. पोलिसांनी प्रकल्पस्थळी बंदोबस्त लावला. संध्याकाळी पुन्हा वेगळे तृतीयपंथी तेथे आले आणि साडेपाच लाखांसाठी धमकावू लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे मोबाईल तपासले असता ते सकाळी धमकावून गेलेल्या तृतीयपंथींचे साथीदार असल्याचे स्पष्ट झाले.
...
आरोपींची नावे अशी
सुगंधी पिल्ले, नागराज पिल्ले, प्रिया पोन्नुस्वामी, विमला अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

