स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची उद्या घोषणा
स्वीकृत नगरसेवकांच्या
नावाची उद्या घोषणा
भाजपचे ४, शिंदे सेनेकडून दोन, तर ठाकरे सेनेचे दोन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा उध्या बुधवारी पालिका सभागृहात करण्यात येणार आहे. भाजप, शिवसेना शिंदे पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष यांच्या पक्षातून स्वीकृत नगरसेवकांची वर्णी मुंबई महापालिकेत लागणार आहे. उद्या मंगळवारी दुपारपर्यंत स्वीकृत नगरसेवकांच्या नावाचे अर्ज पालिकेच्या चिटणीस विभागाकडे सादर करण्याची अंतिम तारीख आहे. तर बुधवारी दुपारी सभागृहात स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने सर्वपक्षीय इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली होती. ऐन निवडणुकीत सर्वपक्षीय इच्छुकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यावेळी बंडखोरी शमवणे सर्वंच राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरली होती. बंडखोरांचे बंड शांत करण्यासाठी बंडखोरांना विविध आश्वासने दिली होती. त्यापैकी एक म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत वर्णी लावणे होते. अखेर २५ फेब्रुवारी रोजी स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा सभागृहात होणार आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते पद भूषवलेले प्रविण छेडा यांचे नाव भाजपकडून स्विकृत नगरसेवक म्हणून समोर आले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सर्वे, माजी नगरसेवक बालकृष्ण ब्रीद यांची नावं समोर आली आहेत.
----
भाजपा
(कोटा ४)
१) प्रवीण छेड़ा - काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते होते
२) नितेश सिंह - विधान परिषदेचे आमदार राजहंस सिंह यांचे पुत्र
३) प्रतीप करपे - एका प्रकरण न्यायप्रविष्ठ
४) कमलाकर दळवी -
---
स्वीकृत नगरसेवक प्रस्ताव
शिवसेन शिंदे
(कोटा २)
१) बालकृष्ण ब्रीद - माजी नगरसेवक
२) राज सुर्वे - आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र
३) उमेश माने - यांचे नाव मागे घेण्याची शक्यता
---
शिवसेना ठाकरे
(कोटा ३)
१) साईनाथ दुर्गे - माजी शिक्षण समिती सदस्य
२) माधुरी मांजरेकर
३) कैलास पाठक
--
कांग्रेस
(कोटा १)
१) वीरेंद्र चौधरी - आज अर्ज दाखल करणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

