आता टीएमएस २.० मुळे जबाबदार आरोग्य व्यवस्था!

आता टीएमएस २.० मुळे जबाबदार आरोग्य व्यवस्था!

Published on

आता टीएमएस २.० मुळे जबाबदार आरोग्यव्यवस्था!
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या प्रणालीचा आरंभ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यात टीएमएस २.० प्रणालीमुळे (ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टीम) रुग्णांकरिता पारदर्शक, जबाबदार आणि सुलभ ठरणारी आरोग्यव्यवस्था निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील चार हजार ५३७ रुग्णालयांमध्ये दोन हजार ३९९ मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने आरंभ करण्यात आला आहे. या टीएमएस २.० प्रणालीचे कार्यान्वयन मध्यरात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे. कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम, सचिव डॉ. विनायक निपुण, सचिव ई रवींद्रन, जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण आदी उपस्थित होते.
...
टीएमएस २.० प्रणालीविषयी...
या प्रणालीमुळे रुग्ण नोंदणीपासून ते उपचार पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, पारदर्शक व ऑनलाइन होणार आहे. रुग्ण नोंदणी ऑनलाइन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. जलद उपचार मंजुरी प्रक्रिया व उपचार स्थितीचे डिजिटल ट्रॅकिंग, डिजिटल कृत्रिम बुद्धिमत्ता मॉनिटरिंगद्वारे तक्रारीचे निरसन केले जाणार आहे. या प्रणालीमध्ये रुग्णालय अंगीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन व विहित मर्यादेत पूर्ण होणार आहे. या योजनेअंतर्गत फसवणूक झाल्यास १५५३८८, १८००२३३२०० या हेल्पलाइनलवर संपर्क साधण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com