अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील गैरव्यवहाराच्या  चौकशीसाठी समिती

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती

Published on

गैरव्यवहारप्रकरणी चौकशी समिती
शहापूरमधील महाविद्यालयाबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई, ता. २४ : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठित केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य मनीषा कायंदे यांनी अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगावमधील गैरव्यवहारप्रकरणी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही सहभाग घेतला. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ही संस्था विनाअनुदानित असल्याने या संस्थेवर प्रशासक नेमता येत नाही. मात्र, या संस्थेविरुद्ध संस्थेतील माजी विद्यार्थ्यांकडून शुल्काबाबतच्या प्राप्त तक्रारी, तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, संघटना, संस्थेचे माजी कर्मचारी यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी गठित समितीमार्फत सखोल चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर केला जाईल.

त्रिस्तरीय समिती नियुक्त
अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न असल्याने याबाबत संस्थेच्या विरोधात कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी मुंबई विद्यापीठानेही त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीचे कामकाज सुरू असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com