आझाद मैदानावर आज ‘खेटर मोर्चा’
आझाद मैदानावर आज ‘खेटर मोर्चा’
आरक्षण वर्गीकरणासाठी लाल सेनेची मुंबईत धडक
मुंबई, ता. २४ : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील वर्गीकरणाच्या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल १५८ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाची धग आता मुंबईपर्यंत पोहोचली आहे. शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलकांनी उद्या (ता. २४) राजधानीत ‘खेटर मोर्चा’ काढण्याचा निर्णय घेतला असून, आझाद मैदान येथे मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.
लाल सेनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येत असून, राज्यभरातील कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. लाल सेनेचे प्रमुख कॉ. गणपत भिसे यांनी सांगितले, की प्रशासकीय दरबारी आमचा प्रभाव नसल्याने आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत आहे; मात्र आम्ही खचून जाणार नाही. हा लढा अंतिम टप्प्यात असून, विजय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. संयम आणि सातत्याच्या बळावर हा संघर्ष पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ही आहे प्रमुख मागणी
अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दी स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध दविंदर सिंग या न्यायनिवाड्यात दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने १४ ऑक्टोबर २०२४ला न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण वर्गीकरण प्रारूप आराखडा ठरवण्यासाठी समिती नेमली आहे. त्या समितीचा तत्काळ अहवाल स्वीकारून आरक्षणात वर्गीकरण करावे आणि तळातील लाभवंचित जातींना संधी निर्माण करून द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

