चेतना महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

चेतना महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

Published on

चेतना महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद
मुंबई, ता. २५ ः वांद्रे (पूर्व) येथील चेतना महाविद्यालय येथे २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘डिजिटल मार्जिनलायझेशन अँड एआय बायस : री-डिफायनिंग बिझनेस अँड सोसायटी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री व भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता नियामक मंडळाचे सदस्य सुरेश प्रभू यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार असून, बीजभाषण एमकेसीएलचे प्रमुख मार्गदर्शक विवेक सावंत करणार आहेत.
ही परिषद हजारीमल सोमाणी महाविद्यालय आणि रामप्रसाद खंडेलवाल व्यवस्थापन महाविद्यालय यांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे. देश-विदेशातील तज्ज्ञ, अभ्यासक व धोरणकर्ते परिषदेत सहभागी होणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शिक्षण, आरोग्य, वित्त, रोजगार आणि उद्योग-व्यवसाय क्षेत्रांवर वाढता प्रभाव लक्षात घेता डिजिटल बहिष्कार, एआय बायस आणि सामाजिक असमानता या मुद्द्यांवर परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. कौशल्यांची कमतरता, भाषिक अडथळे आणि सामाजिक-आर्थिक विषमता यांमुळे काही घटक मागे पडत असल्याची बाब या परिषदेत मांडली जाणार आहे. परिषदेचा समारोप २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा वर्मा आणि डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनिश कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय जगताप यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com