‘एमसीए’साठी ५५ हजार 
विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी

‘एमसीए’साठी ५५ हजार विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी

Published on

‘एमसीए’साठी ५५ हजार
विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी

अर्जातील दुरुस्तीसाठी आजपासून ऑनलाइन सुविधा

मुंबई, ता. २५ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) व मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एमएचएमसीटी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणी २३ फेब्रुवारीला समाप्त झाली. एमसीएसाठी या वर्षी ५५ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी अंतिम नोंदणी, तर एमएचएमसीटीसाठी ५५ विद्यार्थ्यांनी अंतिम नोंदणी केली आहे. नोंदणी अर्जामध्ये दुरुस्तीसाठी २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे.

मागील वर्षी एमसीए सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये ५६,२५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २०२५ पेक्षा ७१५ विद्यार्थ्यांची नोंदणी या वर्षी कमी झाली आहे. मागील वर्षी एमएचएमसीटीच्या सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २०२५पेक्षा २५ विद्यार्थ्यांची घट झाली आहे. एमसीए या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ३० मार्चला होणार आहे. एमएचएमसीटी या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २५ मार्चला होणार आहे. ही सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जातील. विद्यार्थ्यांना अर्जात त्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग यामध्ये दुरुस्ती व बदल करण्यासाठी ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे.

प्रवेश परीक्षेस नोंदणी
प्रवेश परीक्षा २०२३-२४ २०२४-२५ २०२५-२६ २०२६-२७
एमसीए ३४,२४६ ३९,९६५ ५६,२५७ ५५,५४२
एमएचएमसीटी ३५ १७९ ८० ५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com