बोगस ई-चलनाद्वारे 
फसवण्याच्या प्रयत्न

बोगस ई-चलनाद्वारे फसवण्याच्या प्रयत्न

Published on

बोगस ई-चलनाद्वारे
फसवण्याच्या प्रयत्न

एक पोलिस जाळ्यात, परस्पर कर्ज घेऊन ५.८२ लाख रुपये वळते

मुंबई, ता. २५ : सायबर भामट्यांनी एका व्हॉट्सॲप समूहात बोगस ई-चलनाआडून एपीके फाइल पाठवून चक्क पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांना फसवण्याचा प्रयत्न केला. या समूहात सदस्य असलेला एक पोलिस शिपाई बळी ठरला असून, तब्बल एक महिन्यानंतर त्यांच्या खात्यातून परस्पर ५.८२ लाखांचे कर्ज घेण्यात आले आणि ती रक्कम अन्य खात्यांत वळती करण्यात आली. गेल्या आठवड्यात कुर्ल्यातील विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिमेकडे राहणारे सौरभ बंड (२८) मुंबई पोलिस दलात पोलिस शिपाईपदी नियुक्त आहेत. ते ‘पोलिस परिवार’ नावाच्या व्हॉट्सॲप समूहात सदस्य असून, या समूहात परिसरात राहणारे अन्य पोलिस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी आहेत. गेल्या वर्षी २३ डिसेंबरला या समूहावर ई-चलनाआडून एपीके फाइल आली होती. ती अनेकांनी डाउनलोड केल्याने आर्थिक फसवणूक होईल या भीतीने सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. तज्ज्ञांनी ती फाइल डिलीट केली हाेती; मात्र बंड यांच्या नावे कर्ज घेऊन पाच लाख ८२ हजार रुपये अन्य खात्यांत वळते केल्याचे उघड झाले आहे. याबाबत त्यांनी सायबर हेल्पलाइनवर तक्रार दिली. तेथून ती विनोबा भावे नगर पोलिसांकडे वर्ग झाली. त्या तक्रारीआधारे पोलिसांनी गेल्या आठवड्यात गुन्हा नोंदवला.
-----
अशी झाली फसवणूक
- १४ जानेवारीला बंड यांना त्यांच्या बँकेने सहा लाख ७० हजार रुपयांचे अतिरिक्त कर्ज मंजूर केल्याचा संदेश प्राप्त झाला.
- गेल्या वर्षी त्यांनी बँकेचे सुमारे तीन लाखांचे कर्ज घेतले होते; मात्र अतिरिक्त कर्ज मंजूर करण्याबाबत त्यांनी कधीच मागणी केली नव्हती.
- अतिरिक्त कर्ज रक्कम खात्यावर आल्याने बंड यांनी तातडीने बँक शाखा गाठून चौकशी केली. तोवर त्यातील पाच लाच ८२ हजार रुपये परस्पर अनोळखी खात्यांवर वळते झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com