राज्य सरकार, ब्रिस्टॉल विद्यापीठात सामंजस्य करार

राज्य सरकार, ब्रिस्टॉल विद्यापीठात सामंजस्य करार

Published on

राज्य सरकार-ब्रिस्टॉल विद्यापीठात सामंजस्य करार

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

मुंबई, ता. २५ : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विधान भवन येथे सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या कुलगुरू व अध्यक्षा प्रा. एव्हलिन वेल्च, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या मुख्य संचालन अधिकारी लुसिंडा पार, संचालक ज्युलिया हॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन दामेरा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की ब्रिस्टॉल विद्यापीठासारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेसोबत करार होणे ही अभिमानाची बाब आहे. या सहकार्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी सक्षम असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण
या करारानुसार मुख्यमंत्री व ब्रिस्टॉल विद्यापीठ शिष्यवृत्ती योजना संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे. सामाजिक व आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी १०० टक्के शिक्षण शुल्क माफ करण्यात येईल. या शिष्यवृत्तीचा संपूर्ण खर्च ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पस उचलणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com