डिसेंबर २०२६ पर्यंत सात मोठे प्रकल्प पूर्णत्वास
डिसेंबर २०२६ पर्यंत सात मोठे प्रकल्प पूर्णत्वास
वाढीव खाटांमुळे रुग्णांना तातडीची, अधिक सोयीस्कर सेवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : महापालिकेने अनेक इमारतींचे बांधकाम आणि पुनर्वसन हाती घेतले आहे. बुधवारी (ता. २५) सादर केलेल्या आरोग्य अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या बांधकामाची घोषणा किंवा तरतूद करण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम आणि पुनर्वसन होणाऱ्या
प्रकल्पांवर भर देण्यात आला असून, डिसेंबर २०२६ पर्यंत जवळपास सात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सुविधा मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.
सर्व रुग्णालयांचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार आहे. वाढीव खाटांमुळे रुग्णांना अधिक सोयीस्कर व तातडीची वैद्यकीय सेवा मिळेल. महानगरातील वाढती लोकसंख्या आणि आरोग्यसेवेची गरज लक्षात घेता हा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे. यंदा उपलब्ध होणाऱ्या २,७०६ खाटांमुळे रुग्णभार कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
१. कस्तुरबा रुग्णालय
कस्तुरबा रुग्णालयातील भाजलेल्या रुग्णांच्या कक्षाचे अत्याधुनिकीकरणाचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.
२. भगवती रुग्णालय
४९० खाटा असणाऱ्या भगवती रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.
३. भाभा रुग्णालय
वांद्रे पश्चिम येथील के. बी. भाभा रुग्णालयाचा पुनर्विकास सुरू असून, ११ मजले असलेल्या या नवीन रुग्णालयाचा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.
४. सिद्धार्थ रुग्णालय
गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास सुरू आहे. ३०६ रुग्णशय्या असलेल्या रुग्णालयाचे काम सुरू असून, ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय
कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम सुरू आहे. जून २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
६. नाहूर रुग्णालय
नाहूर येथील भांडुप मल्टिस्पेशालिटी ३६० रुग्णशय्या असलेल्या रुग्णालयाचे काम सुरू असून, ते सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
७. क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय
विक्रोळीच्या क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले या रुग्णालयाचा पुनर्विकास होत असून, ५०० खाटा असतील. या रुग्णालयाचे बांधकाम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.
अतिरिक्त २,७०६ खाटा
शहरातील विविध भागांमध्ये पुनर्विकास सुरू असलेल्या अनेक शासकीय रुग्णालयांचे काम वर्ष २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे एकूण ४,५५६ अतिरिक्त खाटा उपलब्ध होणार असून, त्यापैकी २,७०६ खाटा याच वर्षात उपलब्ध होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

