झिरो प्रिस्क्रिप्शन योजना बारगळली

झिरो प्रिस्क्रिप्शन योजना बारगळली

Published on

‘झीरो प्रिस्क्रिप्शन’चा उल्लेख नाही
मुंबई, ता. २५ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी सर्व महत्त्वाची औषधे कोणत्याही समस्येविना उपलब्ध व्हावीत, यासाठी झीरो प्रिस्क्रिप्शन योजना राबविण्याचा निर्णय घोषित केला होता. २०२६-२७च्या अर्थसंकल्पात झीरो प्रिस्क्रिप्शनचा समर्पित उल्लेख करण्यात आलेला नाही.

झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीसाठी तीन वेळा डेडलाइन देण्यात आल्या. प्रत्यक्षात ही योजना राबविताना पालिका आणि केंद्रीय खरेदी खाते यांच्यात ताळमेळ होत नसल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त भूषण गगराणी यांनी यावर सांगितले, की अनुसूचित औषधांच्या यादीतील ९७९ औषधांची खरेदी पूर्ण झाली आहे, तर १९८ औषधांसाठी टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही किंवा काही कारणांमुळे ती प्रक्रिया रद्द करावी लागली. झीरो प्रिस्क्रिप्शन संकल्पनेअंतर्गत १२ शेड्यूल तयार करण्यात आले होते. त्यापैकी ११ शेड्यूल औषधांशी संबंधित असून एक शेड्यूल इम्प्लांट्सशी निगडित आहे. इतर ११ शेड्यूल्स ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने राबवण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com