आता मुंबई स्वच्छतेचा क्रेझ वर्षभर!
आता मुंबई स्वच्छतेचा क्रेझ वर्षभर!
महापालिकेचा ‘मुंबई स्वच्छता संकल्प ३६५’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई वर्षभर चकाचक ठेवण्यासाठी महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात ‘मुंबई स्वच्छता संकल्प ३६५’ या व्यापक अभियानाची अधिकृत घोषणा केली आहे. स्वच्छता ही केवळ एक मोहीम नसून ती सातत्यपूर्ण नागरी संस्कृती बनली पाहिजे, या दृष्टिकोनातून हे अभियान राबवण्यात येत आहे.
या अभियानात मुंबईतील गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, उद्याने, व्यापारी संकुल आणि अगदी वॉर्ड स्तरावरही सहभाग नोंदवता येणार आहे. सहभागी संस्थांना आपली माहिती समर्पित पोर्टलवर अपलोड करावी लागेल. याचे मूल्यमापन कोणत्याही सरकारी दबावाशिवाय एका स्वतंत्र तृतीय पक्ष संस्थेमार्फत केले जाईल. प्रत्येक सहभागी संस्थेच्या कामगिरीनुसार त्यांना प्लॅटिनम, गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ अशा ग्रेडिंग पद्धतीने सन्मानित केले जाईल. तसेच उत्कृष्ट कामगिरीसाठी रोख पुरस्कारही दिले जातील. यासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वच्छता ही मुंबईकरांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनावी, हाच या ३६५ दिवसांच्या संकल्पाचा मूळ उद्देश आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
----
पर्यटन, गर्दीच्या ठिकाणी सुविधा
पर्यटन आणि गर्दीच्या ठिकाणी आधुनिक सुविधांनी सज्ज अशी सात आकांक्षी शौचालये बांधली जात आहेत. यामध्ये स्तनपान कक्ष आणि सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनसारख्या सुविधा असतील. यासाठी २०२६-२७च्या अर्थसंकल्पात ९४ कोटींची तरतूद आहे.
........
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

