अनिल अंबानी यांचे निवासस्थान जप्त
अनिल अंबानी यांचे निवासस्थान जप्त
कर्ज घोटाळा प्रकरण
मुंबई, ता. २५ : कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उद्योगपती अनिल अंबानी यांचे पाली हिल येथील निवासस्थान ‘अबोड’ जप्त केले. या १७ मजली निवासस्थानाचे बाजारमूल्य ३,७१६ कोटी रुपये असावे, असा अंदाज आहे. ईडीने आतापर्यंत अनिल अंबानी समूहाची १५,७०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
अनिल अंबानी समूहाशी संलग्न रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड या दोन कंपन्यांना २०१७ -१८ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षात येस बँकेने तब्बल तीन हजार कोटींचे कर्ज दिले. ती रक्कम या कंपन्यांद्वारे अन्य संलग्न किंवा बोगस कंपन्यांमध्ये वळविण्यात आली. आपापसांत उसनी रक्कम घेतली, असा आभास निर्माण करून हे व्यवहार केले गेले. हे कर्ज मिळवण्यासाठी या कंपन्यांनी येस बँकेच्या प्रमुखांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने केलेल्या तपासात कर्ज मंजूर करण्याआधीच्या पडताळणी प्रक्रियेसह अन्य आवश्यक प्रक्रियेस संशयित बँक अधिकाऱ्यांनी बगल दिली. अर्ज केला त्याच दिवशी किंवा त्याच्या काही दिवस आधी बँकेने कर्ज मंजूर केली, अशी माहिती उघड झाली. त्याआधारे ईडीने गेल्या जुलै महिन्यात या कंपन्यांशी संबंधित ३५ ठिकाणांवर छापे घेतले. ऑगस्ट महिन्यात अंबानींच्या चौकशीची पहिली फेरी पार पडली. या घोटाळ्याबाबत त्यांच्याकडे पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. ईडीने त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

