भरती प्रक्रियेत गैरप्रकार
चार उमेदवारांवर गुन्हा

भरती प्रक्रियेत गैरप्रकार चार उमेदवारांवर गुन्हा

Published on

भरती प्रक्रियेत गैरप्रकार
चार उमेदवारांवर गुन्हा
मुंबई : मरोळ येथे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या चार उमेदवारांविरोधात पवई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ओमकार पवार (नाशिक) आणि सुयश खांडे (मुंबई) यांनी १,६०० मीटर धावणीत (४०० मीटरच्या चार फेऱ्या) एकही फेरी न मारताच चाचणी पूर्ण केल्याचे भासवले. त्यांचे गुण पाहून परीक्षा घेणाऱ्या पोलिसांना संशय आला. सीसीटीव्ही चित्रण पडताळल्यावर ही चोरी पकडली गेली. अन्य प्रकरणात एका उमेदवाराची ४०० मीटर धावणी शर्यत दुसऱ्या उमेदवाराने दिल्याचे उघड झाले. ओमकार बबन वांजूळ आणि सागर टिळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com