गिरीश प्रभुणे यांना प्रियोळकर पुरस्कार
गिरीश प्रभुणे यांना
प्रियोळकर पुरस्कार
मुंबई, ता. २६ : मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधकांना मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी अ. का. प्रियोळकर ज्येष्ठ संशोधक पुरस्कार प्रदान केला जातो. या वर्षीच्या अ. का. प्रियोळकर ज्येष्ठ संशोधक पुरस्कारासाठी पुरस्कार समितीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची निवड केली आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच मुंबई विद्यापीठातर्फे ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ (इंडियन नॉलेज सिस्टीम-आयकेएस) या अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. प्रभुणे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमासाठी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रभुणे यांनी मराठीच्या वैचारिक विश्वाला समृद्ध करणारी साहित्यनिर्मिती केली आहे. ‘लाटाखाली संथ पाणी’ ही कादंबरी, ‘पालावरचं जिणं’, ‘लोक आणि संस्कृती’, ‘पारधी’, ‘परिसाचा संग’, ‘नव भगीरथ’ इत्यादी ग्रंथाचे त्यांनी लेखन केले आहे. पारधी-मराठी शब्दकोश निर्माण करून पारधी समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

