बनावट बॅँक खात्यांतून 
काेट्यवधींचे व्‍यवहार

बनावट बॅँक खात्यांतून काेट्यवधींचे व्‍यवहार

Published on

बनावट बॅँक खात्यांतून
काेट्यवधींचे व्‍यवहार

सायबर भामट्यांना ५५ खाती पुरवणाऱ्या दाेघांना अटक

मुंबई, ता. २६ : बोगस कंपन्या थाटून त्याआधारे उघडलेली बँक खाती सायबर भामट्यांना विकणाऱ्या दोघांना मंगळवारी (ता. २४) गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. शाकीब नवाज शोहरत आली खान आणि जमीर अहमद मोहम्मद जावेद अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना मशीद बंदर येथील मांडवी भागातून अटक करण्यात आली.

जेमतेम शिक्षण घेतलेल्या, बेरोजगार असलेल्या खान, जमीर यांनी कागदोपत्री नऊ कंपन्या थाटल्या. या कंपन्यांच्या नावे विविध बँकांत तब्बल ५५ खाती उघडली. त्यात काही बचत, तर काही चालू खात्यांचा समावेश आहे. याबाबतची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष तीनचे प्रभारी पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर यांना मिळाली. त्याआधारे मांडवी परिसरात छापा घालून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपींनी ही खाती सायबर भामट्यांना आर्थिक फसवणुकीसाठी पुरवल्याचे कबूल केले. वेगवेगळ्या निमित्ताने नागरिकांना फसवून मिळवलेली रक्कम आरोपींनी पुरवलेल्या खात्यांवर जमा होत असे आणि तेथून विविध खात्यांवर वळती होत असे.
----
बॅँक अधिकाऱ्यांची मदत?
गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी पुरवलेली खाती सायबर भामटे पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीतील व्यवहारांसाठी वापरत होते. आरोपींच्या ५५ खात्यांवरून आतापर्यंत कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. खान व अन्सारी यांना इतकी खाती उघडण्यासाठी त्या त्या बँकांमधील अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा संशय असून त्याआधारे तपास केला जात असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com