राज्यात रस्ते अपघातातील मृत्युदरात घट

राज्यात रस्ते अपघातातील मृत्युदरात घट

Published on

राज्यात रस्ते अपघातातील मृत्युदरात घट
‘परिवहन’च्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. मागील जानेवारीच्या तुलनेत यंदाच्या जानेवारी महिन्यात अपघाती मृत्यूची संख्या ११५ (८.०५ टक्के) कमी झाली आहे.
रस्ता सुरक्षा उपाययोजनांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मृत्युदरात लक्षणीय घट झाली आहे. नंदूरबारमध्ये ५० टक्के, सोलापूर शहर ३६ टक्के, वाशीम ३६ टक्के, सिंधुदुर्ग २९ टक्के, वर्धा टक्के, धाराशिव २४ टक्के, गोंदिया २२ टक्के, अमरावती ग्रामीण २२ टक्के, नांदेड २१ टक्के, नागपूर शहर २१ टक्क्यांनी मृत्युदरात घट झाली. राज्यातील अपघाताची संख्या २०३० पर्यंत ५० टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून परिवहन विभाग रस्ता सुरक्षा उपाययोजना अधिक भक्कमपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक तालुक्यात रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक- मालकांवर रडार व इंटरसेप्टर वाहनांमार्फत कारवाई करण्यासाठी ३३२ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. हेल्मेट व सीटबेल्टच्या अंमलबजावणीसाठी रडार व एआय यंत्रणेचा वापर सुरू करण्यात आला आहे.
------
दोन वर्षांतील अपघात व मृत्यू
वर्ष अपघात मृत्यू
जाने. २०२५ ३,१६४ १,४२७
जाने. २०२६ ३,१०० १,३१२
-----
रडार व एआयच्या वापराद्वारे कारवाई
गुन्हा प्रकरणांची संख्या
विनाहेल्मेट (चालक) ८९,६५१
विनाहेल्मेट (प्रवासी) १३,३४८
अतिवेग ८,५२०
विना सीटबेल्ट (चालक) ८,०२४
विना सीटबेल्ट (प्रवासी) ५३७
अवैध पीयूसी ४,६३७
अवैध विमा ४,५१२
ट्रिपल सीट २,५६०
----
राज्य व जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा कक्ष निर्माण करण्यात आला आहे. अपघाताची कारणे व परिस्थिती विचारात घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी रस्ता सुरक्षा उपाययोजना आराखडा तयार केला आहे. ब्लॅक स्पॉटवर डीपीडीसी योजनांतर्गत सुधारणा करण्यात येत आहेत.
- भरत कळसकर, सह परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com