अनिल अंबानी, रिलायन्स कम्युनिकेशनविरोधात गुन्हा

अनिल अंबानी, रिलायन्स कम्युनिकेशनविरोधात गुन्हा

Published on

अनिल अंबानीविरोधात सीबीआयचा गुन्हा
मुंबई, ता. २६ ः बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीआधारे तब्बल २,२२० कोटींच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीविरोधात नवा गुन्हा नोंदवला. त्यानंतर गुरुवारी सीबीआयच्या पथकाने अंबानी यांच्या निवासस्थानासह कंपनीच्या कार्यालयांवर छापे घातले.
२४ फेब्रुवारी रोजी बँकेने केलेल्या तक्रारीनुसार रिलायन्स कम्युनिकेशनने घेतलेले कर्ज दुसरीकडे वळवले. त्यासाठी बोगस लेखानोंदी, बोगस कंपन्या तयार करण्यात आल्या. त्यामुळे बँकेला २,२२० कोटींहून अधिक तोटा झाला, असा आरोप आहे. या तक्रारीआधारे गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याचे सीबीआयने सांगितले. दरम्यान, हे कर्ज खाते २०१७ मध्येच बुडीत निघाले होते; मात्र ते बुडीत जाहीर करण्याच्या बँकेच्या प्रक्रियेला अंबानी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने त्यास स्थगिती दिली; मात्र २३ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने स्थगिती उठवताच बँकेने सीबीआयकडे तक्रार दाखल केली. यापूर्वीही एसबीआयच्या तक्रारीवरून कर्ज घोटाळा, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशनवर गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास स्वतंत्रपणे सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com