फेरीवाला माफियांच्या विरोधात शिवसेना - भाजपची एकमत ; काँग्रेस एकाकी
फेरीवाले माफियांवर कारवाई करा
महापालिका सभेत शिवसेना-भाजपचे एकमत; काँग्रेस एकाकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः मुंबईत भूमाफियांप्रमाणे फेरीवाले माफिया वावरत आहेत. ते फेरीवाला व्यवसायातून, जागा भाड्याने देण्यातून कमाई करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे) आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे पालिका सभागृहात सर्वसाधारण सभेत केली.
बांगलादेशींच्या नावाखाली अधिकृत फेरीवाल्यांवर उगाचच कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करीत काँग्रेस पक्षाचे गटनेते अशरफ आजमी यांनी फेरीवाल्यांची बाजू लावून धरली. तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी यशोधर फणसे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला, त्यामुळे फेरीवाला माफियांच्या विरोधात भाजप-शिवसेना (ठाकरे) यांच्यात एकमत झाल्याचे चित्र सभागृहात दिसले. तर फेरीवाल्यांची बाजू घेणारे काँग्रेस गटनेते अशरफ आजमी आणि त्यांची बाजू घेणारे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक एकाकी पडल्याचे निदर्शनास आले. महापालिका राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करीत नसल्याचे सांगत पालिकेकडून
यारी रोड, वर्सोवा येथे एका महिलेने फेरीवाला व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला असता त्या महिलेकडे फेरीवाला माफियाकडून पैशांची मागणी करण्यात आली. मुंबईत जसे भूमाफिया वाढले आहेत, त्याप्रमाणेच फेरीवाला माफियादेखील वाढले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई पालिकेकडून होत नसल्याची खंत शिवसेनेचे (ठाकरे) ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे यांनी आज पालिका सभेत हरकतीच्या मुद्द्यांद्वारे केली. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि भाजपचे गटनेते, पालिका सभागृह नेते गणेश खणकर यांच्यासह शिवसेना, भाजपच्या नगरसेवकांनी यशोधर फणसे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.
गंभीर इशारा
मुंबईत फेरीवाला व्यवसाय करण्यासाठी हातगाड्या भाड्याने देण्याचा प्रकार घडत आहे. पैसे घेऊन त्यास पाठबळ देणाऱ्या संबंधित पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील प्रभाकर शिंदे यांनी या वेळी केली. त्याचप्रमाणे, या माफिया लोकांना टास्क फोर्सच्या माध्यमातून शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. रोटी, कपडा आणि मकान यांच्या नावाखाली शहराचा बेरंग करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा गंभीर इशारा फेरीवाल्यांची बाजू घेणाऱ्या काँग्रेस पक्षाला दिला. या वेळी सभागृह नेते गणेश खणकर यांनीही यशोधर फणसे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत फेरीवाला माफियांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, फेरीवाला विषयावर विशेष सभा आयोजित करण्याची आणि यशोधर फणसे यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्याची मागणी केली. त्यावर महापौर रितू तावडे यांनी यशोधर फणसे यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात येत असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

