आरटीई प्रवेशातील एक किमीचा फतवा रद्द करा

आरटीई प्रवेशातील एक किमीचा फतवा रद्द करा

Published on

आरटीई प्रवेशातील एक किमीचा फतवा रद्द करा
विधान परिषदेत एकनाथ खडसे यांची मागणी

मुंबई, ता. २७ ः राज्यातील खासगी शाळांमधील आरटीई प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने नव्याने आरटीई प्रवेशासाठी आदेश काढला आहे. त्यानुसार प्रवेशासाठी एक किमी परिसरातील शाळांच्या अटीचा फतवा काढला. या फतव्यामुळे राज्यातील गोरगरिबांच्या ९० टक्के मुलांना आरटीईचे प्रवेश मिळणार नाहीत. यामुळे सरकारने तातडीने आरटीई प्रवेशासाठी एक किमीची अट तत्काळ रद्द करावी आणि पूर्वी जी अट होती ती कायम ठेवावी, अशी मागणी आज विधान परिषदेत सदस्य एकनाथ खडसे यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केली.
आरटीई प्रवेशासाठी सरकारकडे मोठ्या प्रमाणात शाळांचे शुल्क प्रतिपूर्तीचे अनुदान थकले आहे. ते अनुदानही तत्काळ मंजूर करावे, अशी मागणीही खडसे यांनी केली.
राज्यातील शाळांमध्ये शालार्थ आयडीच्या नावाने बोगस शिक्षक भरती करण्यात आली. राज्यात हजारो शिक्षकांकडून पैसे घेऊन त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून संस्थांचालकांनी ही भरती केली. हा राज्यातला सर्वात मोठा घोटाळा आहे. वर्षभरापूर्वीच मी सरकारला या शालार्थ आयडी घोटाळ्याची एसआयटीची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतनर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पण संस्थाचालकांवर कारवाई झाली नाही. ज्या संस्थांमध्ये शालार्थ आयडीचे घोटाळे झाले आहेत, त्या संस्था राजकीय पुढाऱ्यांच्या आहेत. यामुळे या संस्थाचालकांना अटक करणे कठीण हेात आहे. जळगाव जिल्ह्यात तर एक शिक्षक विदेशात राहूनदेखील पाचोऱ्यातून शिक्षक म्हणून सरकारचा पगार घेतोय. बनावट शिक्षकांमुळे हजारो कोटी रुपये सरकारचे जात आहेत. यात केवळ अधिकाऱ्यांवरच नाही, तर संस्थाचालकांवरही कारवाई करून त्यांना अटक केली पाहिजे. मात्र, हे करताना शिक्षकांनाही संरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणीही खडसे यांनी या वेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com