मुलुंड मेट्रोचा स्लॅब अपघाताचे प्रकरण

मुलुंड मेट्रोचा स्लॅब अपघाताचे प्रकरण

Published on

सर्व मेट्रो मार्गिकांचे सुरक्षा ऑडिट करा
उच्च न्यायालयात जनहित याचिका, लवकरच सुनावणी अपेक्षित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुलुंड येथे मेट्रोचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून झालेल्या अपघातानंतर मुंबईतील सर्व मेट्रो मार्गिंकांचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी जनहित याचिकेमार्फत एका वकिलाने उच्च न्यायालयात केली आहे.
मुंबईतील सर्व बांधकामाधीन मेट्रो प्रकल्पांवर तृतीय पक्षामार्फत सुरक्षा लेखापरीक्षण (थर्ड पार्टी सेफ्टी ऑडिट) करण्याची मागणी वकील रुजू ठक्कर यांनी जनहित याचिकेतून केली आहे. या अपघाताच्या कारणांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित प्राधिकरणांना द्यावेत. तसेच भीषण अपघातानंतरही संबंधित कंत्राटदाराविरोधात काळ्या यादीत टाकण्याची (ब्लॅकलिस्टिंग) कारवाई का सुरू करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरणही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) घेण्याची मागणीही याचिकेत केली आहे. ज्या एलबीएस मार्गावर मुलुंड येथे हा अपघात घडला, त्या ठिकाणावरील काम तत्काळ थांबवून सेफ्टी ऑडिट करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचेही याचिकेत नमूद केले आहे.

अनेकांना भीती वाटते
जिथे अपघात झाला तो रस्ता घाटकोपर, ठाणे आदी भागांना जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे, परंतु आपण आणि आपले बहुतांश नातेवाईक या परिसरात वास्तव्यास आहेत. या घटनेनंतर मेट्रो पुलाखालून, प्रवास करताना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांसह अनेकांना भीती वाटायला लागली असल्याचेही ठक्कर यांनी म्हटले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या यादव यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा तपशीलही सादर करण्याची मागणी ठक्कर यांनी केली आहे.
१४ फेब्रुवारीला मुलुंड, एलबीएस रोड येथे मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान मेट्रोच्या स्लॅब चालत्या ऑटोरिक्षा आणि कारवर कोसळला. यात रामधन यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com