सेल्फीसाठी परदेशी पर्यटक तरुणींचा पाठलाग
सेल्फीसाठी परदेशी पर्यटक तरुणींचा पाठलाग
मुंबई, ता. २७ ः पर्यटनासाठी भारतात आलेल्या परदेशी तरुणींचा १५ मिनिटे पाठलाग करत सेल्फीसाठी हट्ट धरणाऱ्या दोन तरुणांविरोधात आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला. परदेशी तरुणीने पाठलाग करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ समाजमाध्यमाद्वारे पोस्ट केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी कारवाई केली.
मी दोन महिने भारतात आहे. हा प्रसंग सोडल्यास आतापर्यंतचा अनुभव खूपच छान होता; मात्र मुंबईत असताना दोन तरुणांनी सेल्फीसाठी पाठ धरली. १५ मिनिटे आमचा पाठलाग केला. अनेकदा नकार देऊनही त्यांनी हट्ट सोडला नाही. एका क्षणाला मी त्यांना अक्षरशः हाताने दूर लोटले. पोलिसांची भीती घातली तरी ते आमच्या मागेच होते, त्यामुळे मी अस्वस्थ झाले. अखेरीस तुमची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असते, असे या तरुणीने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. इनेस फारिया असे या परदेशी तरुणीचे नाव असून ती ट्रॅव्हल व्लॉगर आहे. तिची पोस्ट व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला. या तरुणांचा शोध सुरू असल्याचे उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

