आभासी अटकेतून सुटण्यासाठी घर विकले

आभासी अटकेतून सुटण्यासाठी घर विकले

Published on

आभासी अटकेतून सुटण्यासाठी घर विकले
मुंबई, ता. २८ ः मुलुंड येथील वृद्ध दाम्पत्याला आभासी अटकेत ठेवून १.१६ कोटी रुपये उकळणाऱ्या सायबर भामट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भामट्यांनी पोलिस असल्याचे भासवून इतके घाबरवले की या दाम्पत्याने आपले घर विकले.
तक्रारदार ७८ वर्षीय असून, खासगी कंपनीतून मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त झाले आहेत. त्यांना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पोलिस असल्याचे भासवून भामट्यांनी संपर्क साधला. कोटींचे आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल गुन्हा नोंदवल्याचे सांगितले. बँक खात्यावरील जमा, गुंतवणूक, मालमत्तांचे तपशील घेण्यात आले. तपासासाठी सर्व मालमत्ता जमा करावी लागेल. निर्दोष असल्याचे आढळल्यास ती परत केली जाईल, असे सांगितले. त्यानुसार दाम्पत्याने घर विकले, बँकेतील जमा रक्कम भामट्यांनी सांगितलेल्या खात्यांवर वळती केली, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com