चोरी झालेला चार कोटींचा मुद्देमाल परत
चोरी झालेला चार कोटींचा मुद्देमाल परत
५६७ मोबाईल फोनसह तीन कोटींचे दागिने, किमती वस्तू नागरिकांना परत मिळाल्या
मुंबई, ता. १ : विविध गुन्ह्यांत चोरी झालेली सुमारे चार कोटींची मालमत्ता परिमंडळ-४मधील पोलिसांनी शनिवारी विशेष कार्यक्रम आयोजित करून नागरिकांना परत केली. त्यात ५६७ मोबाईल फोन तसेच तब्बल तीन कोटींचे दागदागिने आणि अन्य किमती वस्तूंचा समावेश आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त विक्रम देशमाने आणि उपआयुक्त आर. रागसुधा यांनी २० जानेवारीपासून चोरी व गहाळ झालेले मोबाईल फोन, घरफोड्यांसह चोरीच्या गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी एका विशेष मोहिमेची आखणी केली. त्यानुसार शीव, माटुंगा, रफी अहमद किडवई मार्ग, भोईवाडा, काळा चौकी, अँटॉप हिल, वडाळा टीटी पोलिस ठाण्यात २०१९ ते २०२६ या कालावधीत घडलेल्या गुन्ह्यांची यादी करून त्यात चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी विशेष पथके त्यात करण्यात आली. या पथकांनी मुंबई, महाराष्ट्रासह विविध राज्यांतून गेल्या महिनाभरात एकूण ४.२६ कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला. हा मुद्देमाल शनिवारी नागरिकांना परत करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

