मुंबईच्या हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेचा ''ॲक्शन प्लॅन''; फेब्रुवारीत १,०८२ ठिकाणी तपासणी

मुंबईच्या हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेचा ''ॲक्शन प्लॅन''; फेब्रुवारीत १,०८२ ठिकाणी तपासणी

Published on

हवेची गुणवत्ता राखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’
फेब्रुवारीत १,०८२ ठिकाणी महापालिकेने केली तपासणी
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २८ : मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात धडक कारवाईची मोहीम राबवली. पालिकेच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाने विविध प्रभागांत (वॉर्ड) केलेल्या कारवाईत १,०८२ ठिकाणांची तपासणी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३५ बांधकामांना ‘कारणे दाखवा’ तर ९३ बांधकामांना ‘काम थांबविण्याची’ नोटीस बजावली आहे.

​२ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये खासगी बांधकामे, पालिकेची विकासकामे आणि इतर शासकीय प्राधिकरणांच्या प्रकल्पांचा समावेश होता. या कारवाईत एकूण १,०८२ ठिकाणी तपासणी, १३५ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस, ​९३ बांधकामांना काम थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांची पूर्तता केल्यानंतर ४८ ठिकाणच्या ‘स्टॉप वर्क’ नोटिसा मागे घेण्यात आल्या.

​‘मिस्टिंग मशिन्स’चा वापर
​हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने रस्त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. ​१,४५४ किमी एवढ्या अंतराच्या रस्त्यांची पाण्याचे टँकर वापरून सखोल स्वच्छता करण्यात आली. ६८४ किमी अंतरावर धुळीचे कण खाली बसवण्यासाठी ‘मिस्टिंग मशिन्स’चा (पाण्याचा तुषार उडवणारी यंत्रणा) प्रभावी वापर करण्यात आला. ‘‘हवेची गुणवत्ता आरोग्यदायी ठेवणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. केवळ दंडात्मक कारवाई न करता, प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक पावले उचलण्यावर आमचा भर आहे,’’ असे पालिकेच्या पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com