चेंबूर मजुर मृत्यू प्रकरण : विकासकावर ''मनुष्यवधाचा'' गुन्हा दाखल करण्याचे महापौरांचे निर्देश

चेंबूर मजुर मृत्यू प्रकरण : विकासकावर ''मनुष्यवधाचा'' गुन्हा दाखल करण्याचे महापौरांचे निर्देश

Published on

चेंबूर मजूर मृत्यू प्रकरण
विकसकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे महापौरांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २८ : चेंबूर येथील सुभाषनगर परिसरात शनिवारी (ता. २८) दुपारी एका बांधकामाधीन इमारतीची परांची कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात सातव्या मजल्यावरून सहा मजूर खाली कोसळले. त्यात एका मजुराचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित विकसक आणि कंत्राटदारावर कठोर कारवाईसह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

​सुभाषनगर येथे ‘आदित्य राज’ या विकसकामार्फत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी दुपारी सातव्या मजल्याचे काम सुरू असताना अचानक परांची कोसळली. यामुळे उंचावर काम करणारे सहा मजूर थेट जमिनीवर आदळले. जखमींना तातडीने घाटकोपर येथील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान एका मजुराचा मृत्यू झाला. उर्वरित पाच जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
​दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी राजावाडी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रुग्णालय प्रशासनाला जखमींवर सर्वोत्कृष्ट उपचार करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

कायद्याचा बडगा उगारा
​घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांना महापौर म्हणाल्या, या बांधकाम ठिकाणी सुरक्षेच्या नियमांना धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने दिली गेली नव्हती. अपघात झाला तेव्हा जबाबदार अभियंता कुठे होता, याची चौकशी होणे गरजेचे आहे. अशा प्रकारची निष्काळजी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी महापालिका आणि म्हाडा प्राधिकरणाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत. बेजबाबदार विकसकांवर कायद्याचा बडगा उगारण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com