इमारत पाडकामादरम्यान मालबा शेजारील इमारतींमध्ये
इमारत पाडकामादरम्यान राडारोडा शेजारील इमारतींमध्ये
विकसक, कंत्राटदारासह इतरांविरोधात गुन्हा
मुंबई, ता. २८ ः पुनर्विकासासाठी जुनी इमारत पाडताना राडारोडा आणि काँक्रीटचे मोठे ठोकळे शेजारील इमारतींवर पडले. या घटनेत या इमारतींमधील कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या बेजबाबदार, निष्काळजीबद्दल विकसक, कंत्राटदार, व्यवस्थापक आणि कामगारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही घटना २५ फेब्रुवारीला घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी विकसक मेसर्स ओरीयंट कॉर्पोरेशन, कंत्राटदार नवदुर्गा इन्फ्रा वेंचर कंपनी, व्यवस्थापक वैभव भरत नांदे, कामगार आणि अन्य जबाबदार व्यक्तींना आरोपी केले.
२३ फेब्रुवारीपासून पुनर्विकास सुरू असलेल्या पर्णकुटीर इमारतीचे स्लॅब, भिंती पाडण्याचे काम सुरू होते.
पर्णकुटीर इमारत पाडताना शेजारील इमारतींना धोका निर्माण होऊ नये यासाठी विकसक, कंत्राटदाराने कोणतेही खबरदारीचे उपाय योजले नव्हते, असा आरोप करत रहिवाशांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी केलेल्या पाहणीत या आरोपांमध्ये तथ्य आढळले. त्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

