

रुग्णालयांनी दरपत्रक प्रदर्शित करणे अनिवार्य
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचे दरपत्रक व रुग्णांच्या हक्कांची नोंदणी दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. ज्या रुग्णालयांकडून हे नियम पाळले जात नाहीत अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.
राज्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचे दरपत्रक जाहीर करण्याबाबत शंकर जगताप यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, की राज्यात १ जुलै २०२४ पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवली जात आहे. योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांना म्हणजेच १२ कोटी ५० लाख नागरिकांना रुपये १० लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमाकवच देण्यात आले आहे.
यापूर्वी या योजनेअंतर्गत १,३६९ रोगांवर उपचार उपलब्ध होते. आता ती संख्या २,२९९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच नोंदणीकृत रुग्णालयांची संख्या २,००० वरून ४,९३३ पर्यंत वाढली असून, येत्या काळात ती ६,९४७ रुग्णालयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील मल्टिस्पेशालिटी रुग्णालये अजूनही योजनेत सामील नसल्याने त्यांना सहभागी करून घेण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या रुग्णालयांचा अतिरिक्त उपचार खर्च शासनाकडून उचलण्याबाबतही विचार सुरू असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले. या चर्चेत विधानसभा सदस्य राहुल पाटील, अतुल भातखळकर, वरुण सरदेसाई, हेमंत ओगले, मनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.