आईमुळे मुलाला पुनर्जन्म
आईमुळे मुलाला पुनर्जन्म
मुंबई, ता. १ : आईचा त्याग आणि धाडसामुळे एका २८ वर्षीय तरुणाला अक्षरशः पुनर्जन्म मिळाला आहे. अंतिम टप्प्यातील मूत्रपिंड निकामी होण्याच्या अवस्थेत असलेल्या मुलासाठी आईने स्वतःचे मूत्रपिंड दान करून जीवदान दिले. मिरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालय येथे या तरुणावर उपचार सुरू होते. त्याला अंतिम अवस्थेतील मूत्रपिंड निकामी होण्याचा आजार तसेच क्रॉनिक इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिक पर्पुरा हा गंभीर रक्तविकार झाला होता. मूत्रपिंडतज्ज्ञ डॉ. पुनीत भुवानिया यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू होते; मात्र प्रकृती सतत खालावत असल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरला होता. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. जयेश धाबालिया यांनी सांगितले की, मुलगा आणि त्याच्या आईचा रक्तगट वेगळा होता. तरीही आईने कोणतीही भीती न बाळगता मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक तपासण्या आणि सुसंगतता चाचण्या पूर्ण केल्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रियेनंतर तरुणावर अतिदक्षता विभागात बारकाईने देखरेख ठेवण्यात आली. नव्याने प्रत्यारोपित मूत्रपिंड सुरळीत कार्यरत राहावे यासाठी डॉक्टरांनी विशेष काळजी घेतली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

