गेल इंडिया महाराष्ट्रात १७८ मेगावॉटचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारणार

गेल इंडिया महाराष्ट्रात १७८ मेगावॉटचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारणार

Published on

१७८ मेगावॉटचे पवन ऊर्जा प्रकल्प
गेल इंडियाची १,७३६ कोटींची गुंतवणूक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडकडून (गेल) महाराष्ट्रात १७८.२ मेगावॉट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. पुढील दोन वर्षांत उभारल्या जाणाऱ्या या वीज प्रकल्पासाठी १,७३६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे राज्याची हरित ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार आहे.
कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात कोळसा जाळावा लागत असल्याने प्रदूषण होते. तसेच सदरच्या प्रकल्पातून तयार होणारी वीज तुलनेने महागडी ठरते. पर्यावरणपूरक ऊर्जा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौर, पवन ऊर्जानिर्मितीला केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जाते. तसेच हरित वीज प्रकल्पातून वीज खरेदी करणे वीज वितरण कंपन्यांना बंधनकारक केले आहे. त्याचाच भाग म्हणून गेल इंडियाकडून महाराष्ट्रात १७८.२ मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीत पवन ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, सदरचे पवन ऊर्जा प्रकल्प पुढील दोन वर्षांत उभारण्याचे नियोजन आहे. दरम्यान, गेल इंडियाचे देशात ११७ मेगावॉट क्षमतेचे वीज प्रकल्प आहे. त्यामध्ये २७ मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प असून, ते राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात आहेत. २०३५ पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com