मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा ''मास्टर प्लॅन''; ६ हजार कोटींची तरतूद

मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा ''मास्टर प्लॅन''; ६ हजार कोटींची तरतूद

Published on

मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट!
‘स्मार्ट पार्किंग ॲप’ विकसित करण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १ : मुंबईतील वाढती वाहनसंख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहरात ३८,००० हून अधिक वाहने उभी राहतील एवढी अवाढव्य पार्किंग व्यवस्था आणि अत्याधुनिक ‘स्मार्ट पार्किंग ॲप’ विकसित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूदही करण्यात आली आहे.
​सध्या मुंबईत ६५ ठिकाणी सशुल्क वाहनतळे सुरू असून, त्यांची क्षमता ८,२५८ वाहनांची आहे. मात्र, भविष्यातील गरज ओळखून पालिकेने नवीन ३७ ठिकाणी सार्वजनिक वाहनतळांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे पार्किंगची क्षमता २९,७६९ ने वाढणार आहे. रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगमुळे होणारी कोंडी कमी होण्यास मदत होईल. ​​प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा भाग म्हणून आता दोन मजली भूमिगत वाहनतळ उभारले जाणार आहे. ‘जी/उत्तर’ विभागात हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात असून, त्यानंतर संपूर्ण मुंबईत अशा प्रकारची भूमिगत पार्किंग व्यवस्था उभारली जाईल.

घरबसल्या पार्किंग स्लॉट करा ‘बुक’
​मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठी पालिका ‘स्मार्ट वाहनतळ प्रकल्प’ राबवत आहे. याचे मुख्य आकर्षण म्हणजे, ​मोबाईल ॲप्लिकेशन आहे. नागरिक आपल्या इच्छित स्थळी जाण्यापूर्वीच मोबाईलवरून पार्किंगची जागा आरक्षित करू शकतील. ​पीपीपी मॉडेलवर भर देण्यात येत आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राबवला जाणार असल्याने पालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. उलट महसुलात वाटा मिळेल. पहिल्या टप्प्यात ५३० नवीन वाहनतळांवर ही सुविधा असेल, त्यानंतर ती सर्वत्र लागू केली जाईल.

​वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पालिकेने तिजोरी उघडली आहे.​२०२५-२६ (सुधारित अंदाज) ६,००० कोटी,​२०२६-२७ (अर्थसंकल्पीय अंदाज) ६,८७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ​या विकासकामांमुळे मुंबईतील रस्ते मोकळे होतील आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com