अमेरिका इराण युद्धाचा दुसऱ्या दिवशीही विमानसेवेला फटका

अमेरिका इराण युद्धाचा दुसऱ्या दिवशीही विमानसेवेला फटका

Published on

मुंबईतील १२५ विमानांचे उड्डाण रद्द
अमेरिका-इराण युद्धाचा दुसऱ्या दिवशीही विमानसेवेला फटका
मुंबई, ता. १ : इराण-इस्राईल युद्धाने जगभरातील हवाई वाहतुकीला मोठा धक्का बसला आहे. रविवारी (ता. १) दुपारी अडीच वाजेपर्यंत मुंबई विमानतळावरील १२५ विमानांचे उड्डाण रद्द झाले. यामुळे शेकडो प्रवासी विमानतळांवर अडकले असून, विद्यार्थी, खेळाडू, पर्यटक आणि सामान्य नागरिकांचा यात समावेश आहे.
अमेरिका आणि इस्राईलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर आखाती देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले. परिणामी, देशातील प्रमुख विमानतळांवर उड्डाणे थांबली. मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणारी एअर इंडियाची रविवार-सोमवारची सर्व उड्डाणे रद्द झाली.
इंडिगोनेही पश्चिम आशिया आणि काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे रद्द केली. त्यामुळे मुंबई-लंडन सेवा प्रभावित झाली. एअर इंडियाने अडकलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान मध्यमार्गाने मुंबईला उतरविण्यात आले. विमान वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. विमान कंपन्या पर्यायी मार्ग आणि परतावा देण्याचे आश्वासन देत आहेत. हा संघर्ष लांबला तर हवाई वाहतुकीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com