

अल्पवयीन कारचालकाविरोधात प्रौढांप्रमाणे
खटला चालवण्याची मागणी
घाटकोपरवासीयांचा मेणबत्ती मोर्चा
मुंबई, ता. १ ः ध्रुमिल पटेल अपघाती मृत्यू प्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरोधातील खटला बालन्यायालयात न चालवता तो प्रौढ असल्याचे मानून नियमित न्यायालयात चालवावा, या मागणीसाठी रविवारी घाटकोपरमध्ये नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढला.
५ फेब्रुवारीला रात्री विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालय परिसरात ध्रुमिल आणि त्यांची पत्नी मेनल यांच्या दुचाकीला एका भरधाव कारने धडक दिली. त्यात दोघे गंभीर जखम झाले. उपचारांदरम्यान ध्रुमिल यांचा मृत्यू झाला, तर मेनल यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. तपासादरम्यान कार अल्पवयीन चालवत होता, असे स्पष्ट झाले. अपघात घडला तेव्हा या तरुणाचे वडीलही कारमध्ये उपस्थित होते. पोलिसांनी या गुन्ह्यात दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला.
मात्र, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरोधातील खटला बाल न्यायालयात चालवला जाणार आहे. आरोपी तीन महिन्यांत प्रौढ होणार आहे. अनावधानाने त्याच्याकडून हा अपघात घडलेला नाही. याचे समाजमाध्यम खाते चाळल्यास त्याने याआधीही जीवघेणे स्टंट केले आहेत. भरधाव, निष्काळजीने कार चालवण्याची नशा त्याच्या डोक्यात भिनली होती, असे नमूद करत पटेल कुटुंबाने या तरुणाविरोधात नियमित न्यायालयात खटला चालल्यास ध्रुमिल यांना न्याय मिळेल, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी रविवारी पटेल कुटुंबीय, नातेवाईक, परिचित आणि परिसरातील नागरिकांनी घाटकोपर ते अपघात घडलेल्या विद्याविहार येथील घटनास्थळापर्यंत मोर्चा काढला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.