मुंबईतील ६१२ पुलांसाठी सुरक्षा आराखडा!

मुंबईतील ६१२ पुलांसाठी सुरक्षा आराखडा!

Published on

मुंबईतील ६१२ पुलांसाठी सुरक्षा आराखडा!
मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान; पालिकेची व्यापक मोहीम
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३ : मुंबईतील पुलांचे वाढते वय आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता महापालिकेने शहरातील सर्व ६१२ पुलांच्या सुरक्षिततेसाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. पुलांचे वार्षिक संरचनात्मक लेखापरीक्षण करून त्यांच्या दुरुस्तीची आणि पुनर्बांधणीची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात आहेत. या मोहिमेमुळे मुंबईकरांना भविष्यात अधिक सुरक्षित आणि अखंडित प्रवास मिळणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
५३२ पुलांसोबतच आता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ८० पूलदेखील पालिकेच्या अखत्यारीत आले आहेत. या सर्व ६१२ महत्त्वाच्या संरचनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पालिकेचे पूल खाते तत्परतेने कार्यरत आहे. यामध्ये उड्डाणपूल, रेल्वेवरील पूल, पादचारी पूल आणि भुयारी मार्ग अशा सर्वांचा समावेश आहे.
​केवळ ऑडिट करून न थांबता पालिकेने कामांची अंमलबजावणी सुरू केली आहे. लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार एकूण १०१ कामे हाती घेण्यात आली असून, त्यांचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले आहे. पूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार,​ २४ पुलांची कामे आधीच पूर्ण झाली असून, ते वाहतुकीसाठी सज्ज आहेत.​ येत्या मार्च २०२६ पर्यंत आणखी २३ महत्त्वाच्या कामांची पूर्तता होणार आहे.​२०२६-२७ या आर्थिक वर्षात सर्वाधिक ३१ कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, २०२९ पर्यंत सर्व १०१ कामे मार्गी लावली जातील.
​अंधेरीतील गोखले रेल्वे पूल, रे रोड पूल आणि वांद्रे स्कायवॉक यांसारखे प्रकल्प पूर्ण झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची मोठी बचत होत आहे. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे, बेलासिस पुलाचे काम वेळेच्या चार महिने आधीच पूर्ण करण्यात आले आहे. दादरचा टिळक पूल आणि भायखळा पुलाचे कामही प्रगतिपथावर असून, रेल्वे आणि पालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून ही कामे वेगाने पूर्ण होत आहेत.

दुरुस्‍तीवर भर
मुंबईतील एकही पूल कमकुवत राहू नये, यासाठी आम्ही वार्षिक ऑडिट आणि दुरुस्तीवर भर देत आहोत. जुन्या आणि जीर्ण पुलांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाचे पूल उभारले जात आहेत, जेणेकरून मुंबईकरांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना आणि भीतीविना पार पडेल, असे पालिकेच्या पूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com