सुरक्षित आरसीएस मेसेजिंगसाठी गुगलची एअरटेलशी भागीदारी
सुरक्षित आरसीएस मेसेजिंगसाठी गुगलची एअरटेलशी भागीदारी
मुंबई, ता. ४ : भारती एअरटेल आणि गुगल यांनी भारतातील लाखो वापरकर्त्यांना सुरक्षित आणि आकर्षक मेसेजिंग अनुभव देण्यासाठी एकत्र काम करण्याची घोषणा केली आहे.
एअरटेलची नेटवर्क इंटेलिजन्स आणि गुगलच्या रिच कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस (आरसीएस) प्लॅटफॉर्म तसेच स्पॅम फिल्टरिंग यांचा संगम करून, वापरकर्त्यांना उच्च-गुणवत्तेचे फोटो/व्हिडिओ आणि मेसेज रिॲक्शन्ससारख्या परस्परसंवादी वैशिष्ट्यांसह आरसीएस मेसेजिंगचा अनुभव मिळेल. त्याचबरोबर, सुधारित संरक्षणामुळे मोबाईल स्पॅम आणि डिजिटल फसवणूक लक्षणीयरीत्या कमी होईल.
व्यावसायिक ओळख तपासण्यांद्वारे संदेश पाठवणाऱ्याची ओळख शोधणे. संवादांना वर्गीकृत करून आणि त्यानुसार निर्बंध लागू करून वापरकर्त्यांना सुविधा देणे. ग्राहकांच्या उपकरणांवर पोहोचण्यापासून, स्पॅम व्यावसायिक संदेश रोखणे. गुगल आणि एअरटेलच्या एआय-सक्षम स्पॅम फिल्टर्सद्वारे संयुक्तपणे चिन्हांकित केलेल्या, पण व्यक्तींकडून येणाऱ्या संदेशांवर मर्यादा घालून वापरकर्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, अशा तपासण्या यातून होतील, असे भारती एअरटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष गोपाल विट्टल म्हणाले.
मागील दीड वर्षात, एअरटेलने कॉल्स आणि संदेशांमधून ग्राहकांची फसवणूक रोखण्याच्या उद्देशाने उद्योगातील पहिल्या एआय-सक्षम उपक्रमांच्या मालिकेद्वारे भारतातील स्पॅम आणि डिजिटल फसवणुकीविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व केले आहे. एअरटेलने आपल्या सर्व नावीन्यपूर्ण स्पॅमविरोधी उपक्रमांद्वारे आतापर्यंत तब्बल ७१ अब्ज स्पॅम कॉल्स आणि २.९ अब्ज स्पॅम एसएमएस रोखले आहेत. यामुळे त्याच्या नेटवर्कवरील आर्थिक नुकसानीच्या मूल्यात तब्बल ६८.७ टक्के घट झाली आहे.
भारतामधील एअरटेलसोबतच्या या भागीदारीमुळे मोबाईल वापरकर्ते आत्मविश्वासाने संवाद साधतील, असे गुगलमधील अँड्रॉइड इकोसिस्टीमचे अध्यक्ष समीर समत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

