मुंबईत फेब्रुवारीत उच्चांकी मालमत्ता नोंदणी

मुंबईत फेब्रुवारीत उच्चांकी मालमत्ता नोंदणी

Published on

मुंबईत फेब्रुवारीत उच्चांकी मालमत्ता नोंदणी
महिनाभरात १२,८४८ मालमत्तांचा खरेदी खत; १४ वर्षांत फेब्रुवारीत सर्वाधिक विक्री

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचे वातावरण असतानाही मुंबईत फेब्रुवारी महिन्यात मालमत्तांची रेकोर्डब्रेक नोंदणी झाली आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नोंदणीचा विचार करता सहा टक्क्यांची वाढ झाली आहे, तर राज्य सरकारच्या तिजोरीत मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून १११८ कोटी रुपयांची भर पडली आहे.
मुंबईत स्थावर मालमत्ताचे दर गगनाला भिडलेले असले तरी प्रत्येक जण येथे घरखरेदीला पसंती देत आहे. त्यानुसार घराच्या किमती वाढत असतानाही मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे नाइट फ्रॅंक इंडिया या संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. फेब्रुवारीमध्ये १२ हजार ८४८ मालमत्ताची नोंदणी झाली आहे. मागील १४ वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी आहे, तर २० टक्के एवढी महसुलात वाढ झाल्याचे दिसत आहे.

वर्ष मालमत्ता नोंदणी महसूल
फेब्रुवारी २०१३ - ४८४० - २४१ कोटी
फेब्रुवारी २०१५ - ४९८६ - २७९ कोटी
फेब्रुवारी २०१७ - ३६६४ - २५३ कोटी
फेब्रुवारी २०१९ - ५३२० - ३५८ कोटी
फेब्रुवारी २०२१ - १०१७२ - ३५३ कोटी
फेब्रुवारी २०२३ - ९६८४ - १११२ कोटी
फेब्रुवारी २०२५ - १२०६६ - ९३५ कोटी
फेब्रुवारी २०२६ - १२८४८ - १११८ कोटी
------
मुंबईच्या घरविक्रीचा आलेख सातत्याने चढता आहे. मागील वर्षाचा विचार करता फेब्रुवारी महिन्यात सहा टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सर्वसामान्यांकडून घरांच्या विक्रीला पसंती दिली जात असल्याने ही वाढ दिसत आहे. तसेच रिअल इस्टेटबाबत लोकांमध्ये असलेला विश्वास दिसून येतो.
- शिशीर बैजल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रैंक इंडिया
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com