परदेशी तरुणींचा सेल्फीसाठी पाठलाग

परदेशी तरुणींचा सेल्फीसाठी पाठलाग

Published on

परदेशी तरुणींचा सेल्फीसाठी पाठलाग;
मुंबई, बिहारमधून आरोपींना बेड्या

मुंबई, ता. ३ ः परदेशी पर्यटक तरुणींचा सेल्फीसाठी पाठलाग करणाऱ्या दोन आरोपींना आग्रीपाडा पोलिसांनी मुंबई, बिहारमधून अटक केली. गुलशनकुमार शर्मा (२०) आणि मनसुखकुमार शर्मा (२२) अशी त्यांची नावे आहेत. दोघे इमारत बांधकामासाठी मजुरी करतात.
गेल्या आठवड्यात ट्रॅव्हल ब्लॉगर इनेस फारिया या तरुणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात दोन तरुण भारतात पर्यटनासाठी आलेल्या इनेस आणि तिच्यासोबतच्या परदेशी तरुणींकडे सेल्फीसाठी हट्ट करताना, पाठलाग करताना स्पष्ट दिसतात. या व्हिडिओखाली इनेसने नमूद केल्यानुसार १५ मिनिटे आमचा पाठलाग सुरू होता. या काळात स्पष्ट नकार दिला, पोलिसांची भीती घातली, हाताने दूर लोटले तरी या तरुणांवर कोणताही परिणाम झाला नाही. हा प्रसंग अस्वस्थ करणारा होता.
इनेसचा व्हायरल पोस्टची मुंबई पोलिसांनी दखल घेतली. इनेसशी संपर्क साधला तेव्हा हा प्रसंग २२ फेब्रुवारीला महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरात घडल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींच्या शोधार्थ पथके तयार केली.
व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत होते. त्याव्यतिरिक्त सीसीटीव्ही चित्रण आणि खबऱ्यांची मदत घेत आरोपी गुलशनकुमार यास २८ फेब्रुवारीला मलबार हिल येथील एका इमारत बांधकाम प्रकल्पस्थळावरून अटक करण्यात आली. अन्य आरोपी गुलशन यास १ मार्चला बिहारमधील त्याच्या गावातून अटक करण्यात आली. दोघांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com