एटीएसचे कुर्ला, गोवंडीत छापे(अपडेट)
एटीएसचे कुर्ला, गोवंडीत छापे
तीन संशयित तरुण ताब्यात; पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय
मुंबई, ता. ३ ः राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी (ता. २) संध्याकाळी कुर्ला, गोवंडीत छापे टाकून तीन तरुणांना ताब्यात घेतले. हे तरुण पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते, असा संशय आहे.
गोवंडी, कुर्ल्यातील काही तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली होती. त्या माहितीची शहानिशा करून एटीएसने कुर्ला आणि गोवंडीतील तीन तरुणांच्या निवासस्थानी सोमवारी संध्याकाळी एकाचवेळी छापे टाकले. झाडाझडतीत संशयाला बळ देणारे साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक संसाधने सापडली. त्या आधारे पुढील चौकशी, तपासासाठी संशयितांना ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
माथी भडकावण्याचे प्रयत्न
संशयितांकडे अन्य साथीदार, समविचारी तरुणांची माथी भडकावण्याचे प्रयत्न, संघटनेत सामील करून घेण्याची धडपड, म्होरक्यांच्या आदेशावरून देशात घातपाती कृतीची संभाव्य तयारी आदींबाबत चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक संसाधने तपासली जात आहेत, असे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

