कंटेनर अंगणवाड्यांना ‘एनओसी’ची प्रतीक्षा
कंटेनर अंगणवाड्यांना ‘एनओसी’ची प्रतीक्षा
म्हाडाकडून १५ उभारल्या; १०साठी जागा मिळेना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : उपनगरांतील झोपडपट्टीत कंटेनर अंगणवाड्या सुरू करण्याचे निर्देश २०२३-२४मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाकडून ठिकठिकाणी १५ सुसज्ज कंटेनर अंगणवाड्या उभारल्या आहेत. त्याशिवाय आणखी १० कंटेनर अंगणवाड्या उभारण्याचे नियोजन असले तरी त्यांना मुंबई पालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्या उभारायच्या कशा, असा प्रश्न आहे.
उपनगरांतील अंगणवाड्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे त्यांना कंटेनरच्या माध्यमातून सुसज्ज अंगणवाड्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाला दिले होते. त्यानुसार म्हाडाने सुमारे १७ बाय १२ चौरस फुटांच्या कंटेनर अंगणवाड्या १५ ठिकाणी उपलब्ध करून दिल्या असून, त्याचा वापर सुरू आहे. तसेच आणखी १० अंगणवाड्या उभारण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. या अंगणवाड्या पालिकेच्या जागेवर उभाराव्या लागणार असल्याने म्हाडाने पालिकेकडे एनओसीसाठी अर्ज केले आहेत. पालिकेने काही ठिकाणी कंटेनर अंगणवाडी उभारण्यास एनओसी दिली असली तरी त्या ठिकाणी अंगणवाडी उभारण्यायोग्य परिस्थिती नाही, तसेच काही ठिकाणांसाठी अद्याप एनओसी मिळाली नसल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे निधी आहे, मंजुरी आहे; पण एनओसी नसल्याने कंटेनर अंगणवाडी उभारायची कशी, असा प्रश्न आहे.
सर्व सोयीसुविधा
म्हाडाकडून उभारल्या जाणाऱ्या कंटेनर अंगणवाड्या १७ बाय १२ चौरस फुटांच्या आहेत. त्यामध्ये मुलांसाठी खेळणी, एसी, टीव्ही, पाणी, वीज, बाथरूम अशा सुविधा आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

