मोबाईल यूटीएस असिस्टंटचा लाभ
मोबाईल यूटीएस असिस्टंटचा लाभ
चार महिन्यांत ३.५४ कोटींचा महसूल; २.७० लाख प्रवाशांना जागेवर तिकीट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : प्रवाशांना रेल्वे तिकीट सहज आणि जलद मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोबाईल यूटीएस असिस्टंट उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या चार महिन्यांत या सहाय्यकांनी तब्बल एक लाख ८९ हजार ७९१ तिकिटांची विक्री केली आहे. त्यातून तीन कोटी ५४ लाख ३४ हजार ५७५ रुपयांचा महसूल मिळाला आहे. या काळात सुमारे दाेन लाख ६९ हजार ९९८ प्रवाशांना जागेवरच तिकीट सेवा देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीत या सेवेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या महिन्यात ५३ हजार ३३ तिकिटे काढण्यात आली. त्याचा लाभ ७२ हजार ७८३ प्रवाशांनी घेतला. या महिन्यातच एक कोटी आठ लाख ८६ हजार ९०० रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज कमी व्हावी आणि विशेषतः गर्दीच्या काळात तिकीट सेवा जलद मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तीन मोबाईल यूटीएस असिस्टंट कार्यरत आहेत. त्यांच्याजवळ मोबाईल फोन आणि लहान तिकीट प्रिंटर दिले असून, ते कॉन्कोर्स, प्रतीक्षागृह किंवा स्थानक परिसरात प्रवाशांशी संपर्क साधून त्वरित तिकीट काढून देतात. तिकिटासाठी प्रवासी रोख तसेच डिजिटल पद्धतीनेही पैसे देऊ शकतात. आवश्यक असल्यास काउंटरमधूनही तिकीट देण्याची सुविधा त्यांना देण्यात आली आहे.
अन्य स्थानकांवरही सुविधा
मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३१ ऑक्टोबर २०२५ला या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आता नवी दिल्ली, कोलकाता, बंगळूर आणि चेन्नई या प्रमुख रेल्वे स्थानकांवरही मोबाईल यूटीएस असिस्टंटची सेवा सुरू करण्यात आली आहे.
......
कोट
प्रवाशांना तिकीट सहज मिळावे आणि गर्दीच्या काळातही जलद सेवा देता यावी, या उद्देशाने मोबाईल यूटीएस असिस्टंट उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ही सेवा वेळेची बचत करणारी आणि सोयीस्कर असल्याने प्रवाशांनी तिचा लाभ घ्यावा.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
मोबाईल यूटीएस असिस्टंटची कामगिरी
महिना - तिकिटे - प्रवासी - उत्पन्न (रु.)
नोव्हेंबर २०२५ - ३७,२८५ - ५४,१८४ - ६७,७२,८१०
डिसेंबर २०२५ - ४९,१६७ - ७०,४६२ - ८०,५६,३१०
जानेवारी २०२६ - ५०,३०६ - ७२,५६९ - ९७,१८,५५५
फेब्रुवारी २०२६ - ५३,०३३ - ७२,७८३ - १,०८,८६,९००
-----
तिकिटे : १,८९,७९१
प्रवासी : २,६९,९९८
उत्पन्न : ३,५४,३४,५७५ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

