चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत किन जी यांनी महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली

चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत किन जी यांनी महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली

Published on

चीनचे वाणिज्यदूत महापौरांच्या भेटीला
द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत किन जी यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात बुधवारी (ता. ४) सदिच्छा भेट घेतली. महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल महापौर रितू तावडे यांचे वाणिज्यदूत किन जी यांनी अभिनंदन केले.

या सदिच्छा भेटीदरम्यान भारत-चीन तसेच मुंबई आणि चीनमधील प्रमुख शहरांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा झाली. सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यापार-उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान तसेच शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याच्या संधींवर दोन्ही मान्यवरांनी सकारात्मक संवाद साधला. किन जी यांनी मुंबई महानगरातील पायाभूत सुविधा व विकासकामांचा विशेष उल्लेख केला. या विकासकामांमुळे मुंबई महानगराचा जागतिक स्तर उंचावला आहे, असे त्यांनी नमूद केले.

रितू तावडे यांनी मुंबई ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची आर्थिक व सांस्कृतिक नगरी असल्याचे नमूद करीत भविष्यातील सहकार्यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त केला. चीन वाणिज्य दूतावासातील अधिकारी वांग जिनशेंग हेही उपस्थित होते.
........

Marathi News Esakal
www.esakal.com