५६ टक्के महिला गुंतवणुकीचे निर्णय स्वतःच घेतात
५६ टक्के महिला गुंतवणुकीचे निर्णय स्वतःच घेतात
डीएसपी म्युच्युअल फंडाचा अहवाल
मुंबई, ता. ४ : आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय स्वतंत्रपणे स्वतः घेण्याची महिलांची संख्या वाढती असून, आता ५६ टक्के महिला आर्थिक गुंतवणुकीबाबत स्वयंपूर्ण झाल्याचा अहवाल डीएसपी म्युच्युअल फंडाने दिला आहे.
ही माहिती डीएसपी म्युच्युअल फंडाच्या अध्यक्ष आदिती कोठारी देसाई यांनी दिली. गुंतवणुकीबाबत स्वतःच निर्णय घेण्याची महिलांची संख्या २०२२मध्ये ४४ टक्के होती. ती आता वाढली आहे. डीएसपी म्युच्युअल फंडाने यूगोव्हच्या साह्याने १३ शहरांमध्ये काही हजार महिलांचे सर्वेक्षण करून हा अहवाल दिला आहे. स्वतःचे स्वतःच गुंतवणुकीचे निर्णय घेण्याबाबत ८४ टक्के महिलांना स्वतःबद्दल आत्मविश्वास असल्याचे डीएसपी विनव्हेस्टर प्लस १०२५-२६ या अहवालात म्हटले आहे. अर्थात पुरुषांपेक्षा महिलाच जास्त प्रमाणात आपल्या जोडीदाराशी सल्लामसलत करून आर्थिक निर्णय घेतात. आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणारे ९४ टक्के गुंतवणूकदार त्याबद्दल समाधानी आहेत, तर ४१ टक्के महिलांनी घर घेण्यापेक्षा पर्यटनाला प्राधान्य दिले. पुरुषांच्या तुलनेत महिला खरोखर आपली गुंतवणूक दीर्घकाळ (पाच ते दहा वर्षे) ठेवतात; मात्र त्यांच्या मते दीर्घकाळ या शब्दाचा अर्थ तीन वर्षे असाच आहे, असेही श्रीमती आदिती देसाई म्हणाल्या.
...
शेअर बाजार पडताना...
७८ टक्के महिला आर्थिक स्वातंत्र्य मिळावे म्हणून गुंतवणूक करतात. घर घेण्यास इच्छुक असलेल्या महिलांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत ३६ वरून २८ टक्क्यांपर्यंत घसरले आहे; मात्र रजा घेऊन मौजमजा करण्याचे प्रमाण वाढले आहे. शेअर बाजार पडत असला तरी १० टक्के महिला आपली गुंतवणूक सुरूच ठेवतात, तर त्या तुलनेत १५ टक्के पुरुष गुंतवणूक चालू ठेवतात, असे म्युच्युअल फंडाचे एमडीओ सीईओ कल्पेन पारेख म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

