‘एआय’मुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेची फेररचना
‘एआय’मुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेची फेररचना
जियो प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू ओमेन यांचे प्रतिपादन
बार्सिलोना, ता. ४ : आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) काळ दूरसंचार क्षेत्रासाठी फक्त तांत्रिक सुधारणांचा टप्पा नसून, तो अर्थव्यवस्था आणि व्यवसाय मॉडेल्सची पूर्णतः फेररचना करेल, असे मत जियो प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू ओमेन यांनी येथे व्यक्त केले.
बार्सिलोना येथील मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये ते म्हणाले, ‘‘औद्योगिक युग उत्पादनाधारित होते. इंटरनेट युगाने कनेक्टिव्हिटी आणि क्लाऊड दिले; मात्र एआय युग आर्थिक समीकरणे पूर्णतः बदलून टाकणार आहे. हा केवळ विस्तार नाही तर संपूर्ण फेररचना आहे. जागतिक स्तरावर एआयमध्ये होत असलेली कित्येक लाख कोटी डॉलरची गुंतवणूक या बदलाची तीव्रता दर्शवते.’’ कंपनीच्या दृष्टिकोनाबाबत मॅथ्यू ओमेन म्हणाले, ‘‘हा बदल दूरसंचार उद्योगासाठी सर्वात मोठी संधी आहे. जियो स्वतःकडे केवळ नेटवर्क पुरवठादार म्हणून पाहात नाही तर ‘इंटेलिजन्स ग्रीड उभारणारा म्हणून पाहते. टेलिकॉमचे चलन मिनिट्सपासून बाइट्सकडे आणि आता टोकन्सकडे वळत आहे. आम्हाला केवळ सर्वात मोठी टोकन पुरवठा व्यवस्था उभारायची नाही, तर सर्वात मोठे टोकन निर्माते बनायचे आहे.’’ मिनिट्स, बाइट्स आणि टोकन्सद्वारे टेलिकॉम उद्योगाचा प्रवास समजावून सांगताना त्यांनी नमूद केले, की सुरुवातीला उत्पन्नाचा आधार व्हॉइस कॉलिंग होता, ज्याची गणना मिनिट्समध्ये होत असे. त्यानंतर डेटा युग आले आणि वापर बाइट्समध्ये मोजला जाऊ लागला. भविष्यात हीच संकल्पना एआय टोकन्समध्ये रूपांतरित होईल.
डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ
ओमेन यांनी आठवण करून दिली, ‘‘जियोने भारतात व्हॉइस सेवा मोफत केल्या आणि डेटा दर जीबीमागे ९ सेंटपर्यंत खाली आणला. यामुळे ५२.५ कोटींहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचली. आता पुढील उद्दिष्ट म्हणजे सर्वात कमी खर्चात टोकन-प्रति-वॅट’ उपलब्ध करून देणे, म्हणजेच परवडणाऱ्या दरात मोठ्या प्रमाणावर इंटेलिजन्स इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

