नायर दंत महाविद्यालय वसतिगृहाचा प्रश्न सभागृहात
नायर दंत महाविद्यालय वसतिगृहाचा प्रश्न सभागृहात
डॉ. माला दीक्षित यांच्यावर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : नायर रुग्णालयातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करून हा गंभीर मुद्दा प्रकाशझोतात आणला होता. या वृत्ताची दखल घेत बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी विधानसभेत हा विषय उपस्थित केला. त्यांनी हा प्रश्न तोंडी उत्तरासह चर्चेसाठी तारांकित प्रश्न म्हणून मांडत सरकारकडून स्पष्ट भूमिका मागितली.
नायर दंत महाविद्यालय वसतिगृहातील अस्वच्छ व अमानुष परिस्थितीला थेट जबाबदार म्हणून अधिष्ठात्री डॉ. माला दीक्षित यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार उपाध्याय यांनी सभागृहात केली. वसतिगृहात नियमित स्वच्छता न होणे, मजल्यांवर कचऱ्याचे ढीग साचणे, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था आणि पसरलेली दुर्गंधी यामुळे सुमारे २०० ते ३०० विद्यार्थी, त्यात इंटर्न डॉक्टरांचाही समावेश आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
प्राथमिक माहितीनुसार, सफाई कंत्राटदार कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे. मात्र, या परिस्थितीस प्रशासकीय पातळीवरील दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सन्मानाशी तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत डॉ. माला दीक्षित यांच्यावर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी. तसेच वसतिगृह व्यवस्थापनासाठी शाश्वत व जबाबदार यंत्रणा उभारावी, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

