मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्यात जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षण देण्याबाबत सामंजस्य करार

मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्यात जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षण देण्याबाबत सामंजस्य करार

Published on

जर्मन, जपानी भाषा प्रशिक्षणाबाबत सामंजस्य
मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळात करार

मुंबई, ता . ५ : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील कौशल्ये प्राप्त व्हावीत. तसेच परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई येथे करण्यात आला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपोल रेड्डी, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे, तसेच सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या सामंजस्य करारानुसार अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या मंडळाशी संलग्न तसेच स्वायत्त संस्थांमधील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागामार्फत जर्मन व जपानी भाषांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार असून, त्यांचे कौशल्य अधिक सक्षम होणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक क्रेडिट्स प्रदान करण्यात येतील. तसेच आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहाय्य दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून देण्यात येणार आहे. भाषेची परीक्षा व क्रेडिट्स प्रदान करण्याची प्रक्रिया मुंबई विद्यापीठामार्फत पार पाडली जाईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या क्रेडिट्सची नोंद त्यांच्या गुणपत्रिकेत अतिरिक्त क्रेडिट्स म्हणून करण्याची कार्यवाही महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी तंत्रशिक्षण मंडळ पदविका संस्थांशी समन्वय साधून इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी करणार आहे. या प्रशिक्षणामुळे पदविका विद्यार्थ्यांसाठी परदेशातील रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास तसेच त्यांच्या कौशल्यवृद्धीस चालना मिळण्यास मदत होणार आहे, असे मंत्री चंद्रकांतदादा टील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com