बीएड, एमपीएड व एमएडसाठी १ लाख १६ हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार
अर्जातील दुरुस्तीसाठी शनिवारपर्यंत सुविधा
मुंबई, ता. ५ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.एड. (जनरल व स्पेशल), बी.एड. (ईएलईसीटी), मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) व मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश नोंदणी २७ फेब्रुवारीला संपली. या तिन्ही अभ्यासक्रमासाठी एक लाख १६ हजार ०१३ विद्यार्थी २०२६ची सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी अर्जामध्ये जर काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठी ७ मार्चपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
एमपीएड, एमएड व बी.एड.च्या या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क अदा करून पूर्ण केलेली आहे. त्यापैकी काही विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना अनावधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्तीसाठीची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुरुस्तीची सुविधा ७ मार्चपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जात त्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग व फक्त बी.एड.साठी ज्या उमेदवारांनी बीएड पर्याय निवडला नाही ते बीएडचा पर्याय निवडू शकतात किंवा उलट पर्याय निवडू शकतात व यामध्ये दुरुस्ती व बदल करण्याची सुविधा देण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

