विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Published on

प्राध्यापक भरतीप्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, ता. ५ : राज्यातील विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकपदाच्या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे. ही भरतीप्रक्रिया कालबद्ध नियोजन करून पूर्ण करावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू व प्र-कुलगुरूंची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच अकृषी विद्यापीठांचे सर्व कुलगुरू, प्र-कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की राज्यातील विद्यापीठांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारीत (रँकिंग) वाढविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठांनी कालबद्ध नियोजन करून शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनवृद्धी, अध्यापनातील नावीन्य आणि प्रशासकीय कार्यक्षमता यांना प्राधान्य द्यावे. गुणवत्तावृद्धीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत प्राध्यापक भरतीप्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील रिक्त पदांची माहिती संकलित करून नियमानुसार भरतीप्रक्रिया राबवावी, असे निर्देश देण्यात आले. सर्व संबंधित संस्थांनी प्राध्यापक भरतीप्रक्रिया जून २०२६ पर्यंत पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले. निर्धारित मुदतीपर्यंत प्राध्यापक भरतीप्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांतील पदसंख्या कमी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही मंत्री पाटील यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com