महानगरप्रदेशातील १५० गुंतवणूकदारांना १० कोटींचा गंडा

महानगरप्रदेशातील १५० गुंतवणूकदारांना १० कोटींचा गंडा

Published on

१५० गुंतवणूकदारांना १० कोटींचा गंडा
मुंबई, ता. ५ ः मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे १५० गुंतवणूकदारांची १० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या निओग्रीन होम्स, नियोजन निधी या बोगस कंपन्या आणि त्याचे संचालक सचिन फडतरे, निखिल शेलार यांच्याविरोधात बुधवारी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे. गुरुवारी या कंपन्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे घालण्यात आल्याचे समजते. शीव येथे राहणाऱ्या कौस्तुभ ठाकरे यांचा निओग्रीन कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करणारा राहुल जोशी मित्र होता. जोशीने जमिनीच्या फसव्या योजना ठाकरे यांना सांगितल्या. त्या योजनेनुसार पाच वर्षे मुदत ठेव स्वरूपात गुंतवणूक केल्यास ५० ते ७५ टक्के परतावा मिळणार होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com